खामगांव शहर भारतीय जनता पक्षाची महिला व कामगार आघाडीची कार्यकारिणी जाहिर 

खामगांव (का. प्र.) :-  भारतीय जनता पक्ष  खामगांव शहराची महिला व कामगार आघाडीची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे कामगार मंत्री ना. अ‍ॅड. आकाशदादा फुंडकर, सोशल मिडीया राज्य सहसंयोजक सागरदादा फुंडकर,  खामगांवच्या नगराध्यक्षा सौ. अर्पणाताई फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या खामगाव शहर अध्यक्षा सौ. भाग्यश्री मानकर यांनी ही  कार्यकारिणी जाहिर केली असून यात उपाध्यक्षपदी सौ. अर्चना लोखंडे, सौ. मनिषा माटे, सौ. निलीमा डोरले,  सरचिटणीस - सौ. स्नेहल गरड, सौ. निकीता माळवंदे, कोषाध्यक्ष - सौ. शितल जावकार, सोशल मिडीया प्रमुख - सौ. स्वाती आमले, मन की बात प्रमुख - सौ. रूपाली गायगोळ तर सदस्य म्हणून सौ. दिप्ती नायसे, सौ. मिनाक्षी डहाके, सौ. ज्योती भुसारी, सौ. अश्विनी वक्टे, सौ. अंजू अग्रवाल, सौ. मिरा मच्छींद्र, सौ. सुनिता सुपेकर,  सौ. शुभांगी कळमकार, सौ. दिपाली वर्‍हाडकर, सौ. अश्विनी चव्हाण, सौ. माधुरी सोनोने, श्रीमती अपेक्षा मुर्‍हेकर यांचा समावेश आहे.  

तसेच खामगांव शहर भाजपा कामगार आघाडी प्रमुख दिलीप शेट्टे यांनी कामगार आघाडीची कार्यकारिणी जाहिर केली असून यामध्ये उपाध्यक्ष - श्रीराम चोपडे, विलास सरोदे, संतोष उंबरकार, सरचिटणीस - विष्णु मुकुंदे, संतोष जुनारे, चिटणीस - संतोष मुळतकार, नंदकिशोर लांडे, मन की बात प्रमुख बाळकृष्ण आव्हाड, कोषाध्यक्ष - उदय कंझारकर, सोशल मिडीया प्रमुख - अनिल सातपुते तर सदस्य म्हणून  श्याम देशमुख, सुनिल आकणकर, मुरलीधर पंजाबी, हरीदार उज्जैनकर, पुंडलीक वसोकार,  गोविंदा वानखडे, विलास खराबे, प्रकाश सोनोने, संतोष तांगडे व गजानन देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post