पियुष उभे याची एमबीबीएससाठी निवड; गुंजकर एज्युकेशन हबच्या वतीने सत्कार

खामगाव( नितेश मानकर): गुंजकर एज्युकेशन हबचा विद्यार्थी पियुष विजय उभे याची एमबीबीएस वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गुंजकर एज्युकेशन हबचे संस्थाध्यक्ष प्रा. रामकृष्णजी गुंजकर सर यांच्या हस्ते पियुषचा सत्कार करण्यात आला. पियुषने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

पियुष उभे हा पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय उभे यांचा मुलगा आहे. मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्याने एमबीबीएससाठी निवड मिळवून आपल्या कुटुंबासह गुंजकर एज्युकेशन हबचे नावही उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post