जळगाव जामोद : ब्रिलियंट आयआयटी अँड मेडिकल फाउंडेशन अकॅडमी मधील इयत्ता दहावीचा विद्यार्थी अनुज ललित राठी याने CBSE परीक्षेत गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

अनुजच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल अकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. प्रमोदकुमार आमले यांनी त्याचे अभिनंदन केले. यावेळी त्याला भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

अनुजच्या या यशामुळे त्याचे पालक, शिक्षक आणि अकॅडमीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गणित विषयातील त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post