कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी वन एशियात प्रथमोपचार प्रशिक्षण : आपत्कालीन परिस्थितीत योग्य मदत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
खामगाव : वन एशिया नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने १ सप्टेंबर रोजी कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षा आणि सर्वांगीण विकास यांना कंपनीकडून सातत्याने प्राधान्य दिले जात असून, त्याच अनुषंगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला वेळेत आणि योग्य प्रथमोपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना विविध आपत्कालीन प्रसंगी आवश्यक प्राथमिक मदत कशी करावी, याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.
![]() |
| Advt. |
कंपनीमध्ये सुरक्षित व सक्षम कार्यपरिसर निर्माण करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य आणि सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. प्रशिक्षित कर्मचारी भविष्यात कंपनीबरोबरच आपल्या कुटुंबीयांना आणि समाजातील नागरिकांनाही आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यास सक्षम ठरतील, असा विश्वास कंपनी प्रशासनाने व्यक्त केला. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच सुरक्षित कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी वन एशिया नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कुठलेही कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आरोग्य सदृढ असणे गरजेचे आहे. त्यानुसार कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी घेऊन व आरोग्य बाबत योग्य मार्गदर्शन शिबिर घेऊन आरोग्याचे मूलमंत्र दिले.


Post a Comment